Wednesday, September 15, 2010

No 1 Natrang Marathi Movie

अतुल कुलकर्णीचा समर्थ अभिनय, अजय-अतुलचं अफलातून संगीत, त्यावरची तितकीच बहारदार नृत्यं आणि तगडं कथानक, या जोरावर मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘ नटरंग ’ नं आज ५७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही आपला अस्सल मराठमोळा रंग दाखवला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान ‘ नटरंग ’ नं पटकावला आणि मराठी लोकसंगीताची ‘ तुतारी ’ राजधानीत दुमदुमली. 

0 Comments:

Post a Comment